लिहाखेडी फाटा ते सारोळा रस्त्याच्या कामाचे लोकार्पण ; ४ कोटी ९० लाखांचा निधी

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सारोळा येथे लिहाखेडी फाटा ते सारोळा रस्त्याच्या कामाचे लोकार्पण माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले. आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातून या रस्त्याच्या कामासाठी ४ कोटी ९० लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे.

या रस्त्याची ग्रामस्थांकडून अनेक दिवसांपासून मागणी होती. विधानसभा निवडणुकीदरम्यान आमदार अब्दुल सत्तार यांनी सारोळा ग्रामस्थांना हा रस्ता पूर्ण करण्याचा शब्द दिला होता. दिलेल्या शब्दाची पूर्तता करत रस्त्याचे काम पूर्ण करून आज त्याचे लोकार्पण करण्यात आले. दिलेला शब्द पूर्ण करता आला, याचा मनस्वी आनंद आहे, असे आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले. 

या रस्त्यामुळे सारोळा व परिसरातील नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या दळणवळणाची मोठी सोय होणार असून, शेतमालाची वाहतूकही सुलभहोणार आहे. रस्ता पूर्ण झाल्याने गावाच्या विकासाला नवी गती मिळणार आहे. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांचा लिहाखेडी व सारोळा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करून या कामाबद्दल गावकऱ्यांनी आभार मानले.

या प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पा. तायडे, जि. प. सदस्य देविदास पालोदकर, सय्यद नासेर हुसेन, कृ. उ. बा.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजना समितीचे सभापती सतीश ताठे, संचालक नानासाहेब रहाटे, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, शिवसेनेचे नगरपरिषद गटनेते सुधाकर पाटील, नगरसेवक सिद्धेश्वर आहेर, नायब तहसिलदार तुकाराम बनकर, साहाय्यक गटविकास अधिकारी आशिष म्हस्के, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता वसीम देशमुख, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे मंगेश डाबके, विशाल वहाढणे तसेच नॅशनल सहकारी सूतगिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, सयाजीराव वाघ, संजय डमाळे, दुर्गाबाई पवार, अशोक देशमुख, प्रशांत क्षीरसागर, राजीव गौर, सचिन पाखरे, राजूमिया देशमुख, अंबादास सपकाळ, प्रकाश साखळे, मारुती पाटील वराडे, रुपेश जयस्वाल, सरपंच मोहन गायकवाड, उपसरपंच नारायण वराडे, कृष्णा बावस्कर, मुक्ताराम पाटील, विष्णू पैलवान विश्वनाथ डापके, लक्ष्मण कल्याणकर विलास बावस्कर, सिताराम गोरे, शेषराव फरकाडे, गणेश काकडे, इम्रान काझी, दादाराव समीन्द्रे, नागेश वराडे, युवराज वराडे, डॉ. प्रवीण वराडे, संदीप लोखंडे, परमेश्वर लहाने, सुनील सनान्से, जफर सय्यद, आरेफ सय्यद, आसिफ सय्यद, प्रवीण जैस्वाल, मच्छिन्द्र दांडगे, आनंदा वराडे यांच्यासह ग्रामस्थ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.